Dehuroad : एटीएम सेंटरची काच फोडल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – हातात कोयता घेऊन दहशत पसरवून एका एटीएम सेंटरची काच फोडली. हा प्रकार मंगळवारी (दि. 27) सकाळी नऊ वाजता आंबेडकर रोड, देहूरोड येथे घडला. देहूरोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

डुंगा उर्फ अनुराग नागेश तेलगु (वय 29, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांनी याबाबत बुधवारी (दि. 27) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डुंगा याने मंगळवारी सकाळी नऊवाजताच्या सुमारास हातात कोयता घेऊन लोकांना शिवीगाळ करत धमकावले. त्यानंतर स्वामी चौक, देहूरोड येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरची काच फोडून नुकसान केले. यावरून गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.