Pimpri : मंडपसाहित्य जाळल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – काही एक कारण नसताना शिवीगाळ करून घराबाहेर ठेवलेले मंडप कापड व इतर साहित्य जाळले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) पहाटे दोनच्या सुमारास विठ्ठलनगर, पिंपरी येथे घडली.

राकेश सुधाकर घणघाव उर्फ चैत्र्या (रा. विठ्ठलगनर, पिंपरी), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी किशोर नागोराव ढोबळे (वय 34, रा. नवीन विठ्ठलनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढोबळे यांच्या खोलीसमोर मंडप साहित्य, मंडप कापड, साउंडसिस्टीम, लाईटिंगचे साहित्य ठेवले होते. विनाकारण आरोपीने फिर्यादी किशोर यांना शिवीगाळ करून रॉकेलसारखा पदार्थ टाकून काडी पेटवून मंडप साहित्याचे जाळून नुकसान केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.