Nigdi Crime News : देशी रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक  

एमपीसी न्यूज : देशी बनावटीचे एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (दि.21) ओटास्किम, निगडी याठिकाणी खंडणी विरोधी पथकाने हि कारवाई केली. 

जेसन जॉन डिकोना (वय 24, रा. ओटास्किम, निगडी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.  खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक संदीप गोपीचंद पाटील यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने 30 हजार 400 रूपये किंमतीचे एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगली होती. खंडणी विरोधी पथकाने त्याच्यावर  कारवाई करत ताब्यात घेतले आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक शाकिर जिनेडी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.