Alandi Crime News : कोयता बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – कोयता बाळगून एका महिलेला शिवीगाळ करत गावात दहशत माजवणा-या एकास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी पिंपळगाव तर्फे चाकण येथे घडली.

सतीश एकनाथ शेळके (वय 30, रा. पिंपळगाव गोलेगाव, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अरुण डामसे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सतीश याने बेकायदेशीरपणे कोयता जवळ बाळगला होता. दरम्यान, गावातील एका महिलेला सतीश याने नाव घेऊन शिवीगाळ व दमदाटी केली. यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सतीश याला अटक केली. याप्रकरणी आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.