Alandi Crime News : उसने दिलेले पैसे मागितल्याने पोटावर मारली बिअरची बाटली

एमपीसी न्यूज – उसने दिलेले पैसे परत मागितल्याने एकाने बिअरची बाटली पोटावर मारून दुखापत केली. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी साडेपाच वाजता मोशी-आळंदी रोडवर डुडुळगाव येथे एका हॉटेलवर घडली.

ऋषिकेश वैजनाथ ठवरे (वय 35, रा. इंद्रायणीनगर, ता. हवेली. मूळ रा. परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिमणाजी काशीराम लवटे (वय 55, रा. डुडुळगाव, ता. हवेली. मूळ रा. परभणी) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी ऋषिकेश याला उसने पैसे दिले होते. ते पैसे फिर्यादी यांनी परत मागितले. या कारणावरून आरोपीने बिअरची बाटली फिर्यादी यांच्या पोटावर मारून जबर दुखापत करून जखमी केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ही घटना दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हा गुन्हा दिघी पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. दिघी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.