Pimpri Crime News : डिस्काउंटमध्ये गाडी आणि चॉईस नंबर देण्याच्या बहाण्याने सव्वा लाखाची फसवणूक, आरोपी ताब्यात

एमपीसी न्यूज – डिस्काउंटमध्ये गाडी आणि चॉईस नंबर देण्याच्या बहाण्याने सव्वा लाखाची फसवणूक करत जुनी गाडी देऊन इसमाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आरोपीला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मार्च ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत पिंपरीत हा प्रकार घडला.

आकाश दशरथ पवार (वय 35, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महेश कृष्णा हेमगुडे (वय 27, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी शुक्रवारी (दि.29) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना डिस्काउंटमध्ये गाडी आणि चॉईस नंबर देण्याचे आश्वासन दिले. त्यापोटी कागदपत्रे आणि टप्याटप्याने सव्वा लाख रुपये घेतले. तसेच, रजिस्ट्रेशन न झालेली जुनी गाडी फिर्यादी यांना देऊन त्यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.