Chakan Crime News : गुटखा विक्रीप्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – कार मधून गुटखा विक्रीसाठी आलेल्या एकाला चाकण पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुटखा, कार आणि मोबाईल फोन असा 6 लाख 56 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 14) सकाळी साडेनऊ वाजता कडाचीवाडी येथे करण्यात आली.

देविदास रोहिदास सहाणे (वय 32, रा. वाकी खुर्द, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक बी एम यादव यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देविदास हा त्याच्या कारमधून गुटखा विक्रीसाठी कडाचीवाडी येथे आला असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शिक्रापूर चाकण रोडवर एका पेट्रोल पंपावर सापळा लावून देविदास याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असताना कारमध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याचे आढळले. पोलिसांनी देविदास याला अटक करून गुटखा, कार व एक मोबाईल फोन असा एकूण 6 लाख 56 हजार 788 रुपयांचा ऐवज जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.