Chakan : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी एकाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा 27 हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

सिद्धार्थ बळवंत नाणेकर (वय 20, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई विजय अशोक मोरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना बुधवारी (दि. 8) माहिती मिळाली की, चाकण चौकातील सुदामाचे पोहे बिल्डिंगसमोर एकजण पिस्तूल घेऊन येणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून सिद्धार्थ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे आढळली. त्याच्याकडून 27 हजरांचा ऐवज जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.