Moshi : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी सलगी करत तिच्याशी अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना बो-हाडेवाडी मोशी येथे घडली.

सुरेंद्रकुमार बिंद वैज्यनाथ बिंद (वय 37, रा. मोशी. मूळ रा. उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 13 वर्षीय पीडित मुलीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळेला जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलून सलगी करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्याशी अश्लील बोलून तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीने गुन्हा दाखल केला. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.