Wakad Crime News : नर्स सोबत गैरवर्तन करत खून करण्याची धमकी; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – नर्स असलेल्या एका महिलेला एका व्यक्तीने जबरदस्तीने गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला. तसेच फोन करून नर्सला तिचा खून करण्याची धमकी दिली. ही घटना 22 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत काळेवाडी फाटा येथे घडली.

पोपट गोरख ताटे (वय 34, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित नर्स महिलेने बुधवारी (दि. 13) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात. आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचा हात पकडून त्यांना जबरदस्तीने गाडीवर बसवण्याचा प्रयत्न केला. तसेच आरोपीने फोन करून ‘तू माझ्याकडे आली नाहीस तर मी तुझा खून करेन’ अशी धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.