Chakan Crime News : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून अर्धा किलो पेक्षा अधिक गांजा आणि इतर साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 28) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास चाकण-तळेगाव रोडवर करण्यात आली.

अक्षय भिमाशंकर शेटे (वय 28, रा. खराबवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह इशान (रा. घोडेगाव ) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक विजय दौंडकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने विक्रीसाठी त्याच्याकडे गांजा बाळगला. त्याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी 13 हजार 375 रुपये किमतीचा 509 ग्राम वजनाचा गांजा, 16 हजारांचा एक मोबाईल फोन, एक हजार 330 रुपये रोख रक्कम असा एकूण 30 हजार 705 रुपयांचा ऐवज जप्त केला.

त्याच्याकडे असलेल्या गांजा बाबत माहिती काढली असता अक्षय याने हा गांजा इशान याच्याकडून विक्रीसाठी आणला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ईशान विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.