Wakad : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 735 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. ही कारवाई शनिवारी (दि. २३) दुपारी पावणेचारच्या सुमारास वाकड येथे करण्यात आली.

अशोककुमार सरूपाराम राणा (वय 21, रा. दत्तमंदीर रोड, वाकड), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस हवालदार बाळासाहेब माधवराव सुर्यवंशी (वय 54) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास पोसिलांनी सापळा लावून आरोपी राणा याला अटक केली. त्याच्याकडे 18 हजार 375 रुपये किंमतीचा 735 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी सर्व गांजा जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.