Hinjawadi : कंपनीतून तांब्याची तार चोरल्या प्रकरणी एकाला अटक

One arrested for stealing copper wire from company.

एमपीसी न्यूज – दोघांनी मिळून कंपनीतून तांब्याची तार चोरली. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारस हिंजवडी फेज तीन येथील NXTRA कंपनीत घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

भीमराव देवराव चव्हाण (वय 44, रा. भोईरवाडी, ता.मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. इंद्रजीत जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जयंत अशोक लोखंडे (वय 31, रा. शिंदे वस्ती, मारुंजी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज तीन येथील NXTRA या कंपनीतून आरोपी भीमराव आणि इंद्रजीत यांनी पाच हजारांची तांब्याची तार चोरून नेली. तार चोरून पळून जात असताना कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी पकडून भीमराव याला पोलिसांसमोर हजर केले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून भीमराव याला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार इंद्रजीत याचा पोलीस शोघ घेत आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.