Sangvi : मॉलमध्ये सौंदर्य प्रसाधनांची चोरी करताना एकाला अटक

एमपीसी न्यूज – मॉलमध्ये सौंदर्य प्रसाधनांची चोरी करताना एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे गुरुवारी (दि. 5) रात्री घडली.

रवींद्र साधू जाधव (वय 40 रा. माऊली कृपा बिल्डिंग, महादेव नगर, दिघी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. धीरज अशोक साठे (वय 31, रा. तनिष्क आर्चिड, मरकळ रोड, आळंदी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळकर नगर पिंपळे गुरव येथे मोर सुपर मार्केट आहे. गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आरोपी रवींद्र जाधव हा फिर्यादी काम करीत असलेल्या मोर सुपर मार्केट येथून तेल, शॅम्पू, बॉडी लोशन आणि परफ्यूम अशी एकूण सुमारे पाच हजार रुपयांची सौंदर्य प्रसाधने चोरून नेताना मिळून आला. पोलीस उपनिरीक्षक राठोड याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.