Wakad : बस चालकास कोयत्याच्या धाकाने धमकावल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – बसला दुचाकी आडवी लावत चालकास कोयत्याचा धाक दाखवून धमकावण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 30) पहाटे रहाटणी येथे घडली.

 

सदानंद काशिनाथ गिरी (वय 35, रा. आझाद चौक, ज्योतिबानगर, काळेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. समाधान मधुकर कांबळे (वय 24, रा. पवनानगर, काळेवाडी) यांनी शुक्रवारी (दि. 30) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी कांबळे हे बस (एमएच 14 / जीडी 9122) घेऊन जात होते. ते रहाटणीतील गोडांबे कॉर्नर येथे आले असता पाठीमागून दुचाकीवरून आरोपी आला. त्याने फिर्यादी कांबळे यांच्या बसला दुचाकी आडवी लावली. त्यानंतर कांबळे यांना कोयत्याचा धाक दाखविला. तसेच त्यांना बस पुढे नेण्यास प्रतिबंध करून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.