Nigdi Crime News : गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने पिस्तुलसारखी वस्तू हातात असल्याचे दाखवून तुमच्या मुलाला मारण्यासाठी आलो आहे अशी धमकी दिली. संभाजी नगर, आकुर्डीगाव, आकुर्डी येथे रविवारी (दि.03) सकाळी 7.45 वा ही घटना घडली.

गिरीष विजय मानकर (वय 35, रा. नानापेठ, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मोहन सुंदर यादव (वय 51, रा. संभाजी नगर, आकुर्डीगाव, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून आरोपी फिर्यादी यांच्या घरासमोर आला व फिर्यादी यांचा मुलगा श्रीपाद यादव याला मोठ मोठ्याने हाक मारू लागला. तो झोपलेला असल्याने फिर्यादी दार उघडले. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली तसेच पॅन्टच्या खिशातून पिस्तुल सारखी वस्तू दाखवत आम्ही श्रीपादला मारण्यासाठी आलोय असे म्हणून गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.