Thergaon Crime News : लोखंडी पालघण हवेत भिरकावत दहशत निर्माण करणा-याला अटक

एमपीसी न्यूज – लोखंडी पालघण हातात घेऊन हवेत भिरकावत आरडाओरडा करून दहशत निर्माण करणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि.01) धनगरबाबा मंदिराजवळ थेरगाव येथे हा प्रकार घडला.

मेहबुब दस्तगीर पटेल (वय 26, रा. थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हातात पालघण घेऊन हवेत भिरकावत आरडा ओरड करत दहशत निर्माण केली. या परिसरातील लोकं त्याला बघून घाबरून जात होते असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पटेल यास अटक करण्यात आली असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.