Pune Crime News: विधवा मुलीसोबत मुलाचे लग्न लावून देण्याची जबरदस्ती, सावकाराला बेड्या

एमपीसी न्यूज – सावकारी जाचाचा आणखी एक प्रकार पुण्यातून उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने व्यवसायासाठी दहा लाख रुपयांचे कर्ज एका खाजगी सावकार कडून घेतले होते. हे कर्ज व्याजासह फेडल्यानंतरही सावकाराने आणखी पैसे द्यावे यासाठी त्या व्यक्तीच्या मागे तगादा लावला. इतकच नाही तर समाजातील विधवा मुली सोबत मुलाचे लग्न लावं नाहीतर मारण्याची धमकी या सावकाराने दिली. दरम्यान या सर्व प्रकारानंतर संबंधित व्यक्तीने पोलिसात धाव घेतली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करत संबंधित सावकाराला अटक केली आहे.

अनिल जय भगवान बंसल (वय 53) असे या सावकाराचे नाव आहे. तो पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरातील हरी गंगा सोसायटीत राहतो. कोथरूड मधील एका 54 वर्षीय व्यक्तीने या प्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा संपूर्ण प्रकार 24 जानेवारी 2017 पासून सातत्याने घडत होता.

Pune Crime News : वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा राग, सावत्र आईचा खून करून मुलगा पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनील बंसल हा व्यवसायिक आहे. मार्केट यार्ड परिसरात त्याची दुकान आहे. काही दिवसांपूर्वी फिर्यादीने व्यवसायासाठीच आरोपीकडून दहा लाख रुपये कर्ज घेतले होते. यासाठी दरमहा 22 हजार रुपये व्याज देण्याचे ठरले होते. आरोपीने फिर्यादी कडून कोथरूड येथील फ्लॅट ची कागदपत्रे आणि कोरा चेक घेऊन करारनामा केला होता. फिर्यादी यांनी आतापर्यंत मुद्दल आणि व्याज असे एकूण 12 लाख 93 हजार रुपये आरोपीला परत केले. तरी देखील तो आणखी पैशाची मागणी करत होता.

इतकेच नाही तर फिर्यादी यांच्या मुलाचे समाजातील विधवा मुलीशी लग्न लावून दे असे आरोपीने त्यांना सांगितले. अन्यथा फ्लॅटची कागदपत्र देणार नाही अशी धमकीही दिली. श्री काय करत मारहाण करण्याची धमकी दिली. गुन्हे शाखेकडे याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित सावकारांना अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.