Wakad crime : मेहुण्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने एकास अटक

एमपीसी न्यूज : मेहुण्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने एकास अटक करण्यात आले आहे.(Wakad crime) याबाबत एका महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सचिन आतकरे, वय 30 वर्षे, रा. मु.पो. सारणी सांगवी तालुका केज, जिल्हा बीड याला या आरोपीला अटक करण्यात आले आहे. ही घटना 20 सप्टेंबरला रात्री 10.30 वा. सुमारे 100 खोल्यांच्या चाळीसमोरील रोडवर, शंभूराज कॉलनी, ज्योतिबा नगर, काळेवाडी, पिंपरी येथे घडली आहे.

NIA Raids PFI : दहशतवाद्यांना आर्थिक मदत, NIA-ATS कडून राज्यात ठिकठिकाणी छापेमारी, 16 जण ताब्यात

फिर्यादी यांचा जावई आरोपी सचिन आतकरे याने त्यांची पत्नी म्हणजेच फिर्यादीची मुलगी ही त्याच्याकडे नांदण्यासाठी जात नाही.(Wakad crime) तसेच फिर्यादी त्यांच्या मुलीस नांदण्यासाठी पाठवित नाही असा आरोपीचा फिर्यादीवर संशय आहे तसेच फिर्यादीचा मुलगा ज्ञानेश्वर हा आरोपी वरील गाडी जाळल्याची केस मागे घेत नाही या कारणावरून चिडून जाऊन आरोपी जावयाने मेव्हणा ज्ञानेश्वर वय 30 वर्षे  यास फिर्यादी राहत असलेल्या शाळेसमोरील रोडवर गाठले. आरोपीने त्याच्या जवळील कटरने ज्ञानेश्वरच्या गळ्यावर वार करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.