Pune : नियंत्रण कक्षेतील महिला कर्मचा-यांना फोन करून अश्लील संभाषण केल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – पुणे शहरामधील नियंत्रण कक्षेतील महिला कर्मचा-यांना फोन करून अश्लील संभाषण केल्या प्रकरणी आरोपीला खडक पोलिसांनी काल शुक्रवारी (दि.26) अटक केली आहे.

प्रशांत शंकर मोरे (वय 24, रा. शिवाजीनगर), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षेतील महिला कर्मचा-यांना फोन करून अश्लील संभाषण करणा-या विरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नियंत्रण कक्षेतील महिला कर्मचा-यांना फोन करून अश्लिल संभाषण करणा-या विरूद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल होते. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान मोबाईल क्रमांक, सीसीटीव्ही फुटेज व खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तांत्रिकरित्या कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात
घेण्यात आले.

हा आरोपी चोरीचे मोबाईल वापरत होता. तसेच त्याच्याविरूद्ध गुन्हेदेखील दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उप आयुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र मोकाशी, पोलीस निरिक्षक विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाजी राठोड, मिना तडवी, महिला पोलीस निरिक्षक व त्यांचे सहकारी कर्मचारी, इम्रान नदाफ, महावीर दावणे यांनी केली आहे. याप्रकरणी पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.