Wakad Crime News : गुटखा विक्री प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज – विक्रीसाठी गुटखा बाळगणाऱ्या तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली असून, 47 हजार 273 रुपये किमतीचा गुटखा व 70 हजार रुपये किमतीची दुचाकी, असा एकूण एक लाख 17 हजार 273 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 15) दुपारी साडेचारच्या सुमारास वाकडे येथे मानकर चौकाजवळ करण्यात आली.

रमेश गुलाबराम चौधरी (वय 26, रा. पिंपळे गुरव, मूळ रा. मुंडारा, ता. बाली, जि ‌ पाली, राजस्थान) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस हवालदार मधुकर मल्लिनाथ कोळी यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने गुटखा प्रतिबंधित असताना देखील रमेश चौधरी गुटखा विक्री करत असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर कारवाई करून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून 47 हजार 273 रुपये किमतीचा गुटखा व 70 हजार रुपये किमतीची दुचाकी, असा एक लाख 17 हजार 273 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.