Bavdhan Crime News : अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी एकाला अटक, सहा महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तसेच, सहा पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असून, 2 लाख 72 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बावधन, ता. मुळशी येथे शनिवारी (दि.21) ही कारवाई करण्यात आली.

विनायक मनोहर कुद्रेमणी (वय 20, रा. पॉपलरनगर, वारजे) असे अटक आरोपीचे नाव आहे. तसेच, रॉकी उर्फ ऋषिकेश कदम आणि स्नेहल कदम या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

पोलीस हवालदार राजेंद्र सिताराम कुरणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अवैध वेश्याव्यवसाय चालवत होते. हिंजवडी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून सहा पिडीत महिलांची सुटका केली. या कारवाईत रोख आठ हजार रूपये, 15 हजार रूपयांचा मोबाईल आणि 2.50 लाख रुपये किंमतीची कार असा 2 लाख 72 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक आरोपी अटक असून, हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.