Dighi Crime News : रस्त्यात अडवून महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – रस्त्यात बुलेट आडवी लावून अडवणूक करून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. आळंदी विश्रांतवाडी रोडच्या कडेला, दिघी येथे 16 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

साहिल सन्नाउल्ला शहा (वय 23, श्रीराम कॉलनी, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साहिल शहाच्या विरोधात एका महिलेने शुक्रवारी (दि.16) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी फिर्यादी महिलेचा मित्र असून, त्याने फिर्यादी यांचा पाठलाग करुन रस्त्यात बुलेट आडवी लावून अडवणूक केली. आरोपीने फिर्यादी महिलेला शिवीगाळ केली व तिच्या मामाचा कानाखाली मारली., शिवाय आरोपीने फिर्यादी महिलेच्या बहिणीचा सुद्धा हात पिरगळून कानाखाली मारली असे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.