BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon : तळेगाव येथील रोशन हिंगे खून प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे जवळ माळवाडी येथे हॉटेल ऐश्वर्याजवळ एका सतरा वर्षीय मुलाचा पाठलाग करून खून करण्यात आला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

किशोर पानसरे (वय 32, रा. इंदुरी, ता. मावळ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रोशन उर्फ मट्या हिंगे (वय 17, रा. इंदुरी, ता. मावळ, पुणे) याचा पाठलाग करून खून करण्यात आला होता.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पासलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन हिंगे याच्या खून प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी किशोर पानसरे हा रोशन हिंगे खून प्रकरणातला मुख्य आरोपी असून अन्य पाच ते सहा जणांची नावे शोधून त्यांना पकडण्याचे काम सध्या सुरु आहे. आरोपी किशोर पानसरे याच्या भावाचा मागील वर्षी निर्घृण खून करण्यात आला होता. मयत रोशन हिंगे हा त्या खुनी गॅंगमधील आरोपी होता. त्याचा राग मनात धरून आरोपी किशोर पानसरे याने अन्य पाच ते सहा जणांच्या मदतीने रोशनचा पाठलाग करून बुधवारी (दि. 28, मार्च) खून केला.

असा झाला रोशन हिंगेचा खून

मयत रोशन हिंगे सकाळी साडेआठच्या सुमारास तळेगाव इंदुरी रस्त्यावरून दुचाकीने जात होता. त्याच्यासोबत अन्य एक मुलगा होता. त्यांची दुचाकी माळवाडी येथे हॉटेल ऐश्वर्याजवळ आली असता, एका चारचाकी गाडीने रोशन हिंगे याच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये रोशन हिंगे व त्याचा मित्र खाली पडले. चारचाकी गाडीतून आलेले हल्लेखोर उतरले. त्यांना पाहून रोशन व त्याच्या मित्राने पळ काढला. मात्र हल्लेखोरांनी रोशनचा पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यावेळी त्याचा मित्र घाबरून पळून गेला. धारदार शस्त्राने वार केल्याने रोशन गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. रोशन हा बालगुन्हेगार होता.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3