Nigdi Crime News : घरावर दगडफेक करून धमकी देत महिलेचा विनयभंग; एकजण अटकेत

एमपीसी न्यूज – घरावर दगड, बाटली फेकून शिवीगाळ करत महिलेशी झटापट करून कपडे फाडून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार ओटास्कीम, निगडी येथे मंगळवारी (दि. 14) रात्री अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

विशाल प्रकाश पंडीत (वय 36, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 15) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंगळवारी रात्री त्यांच्या घराच्या किचनमध्ये असताना अचानक घराच्या दरवाजावर दगड मारत असल्याचा आवाज ऐकू आला. फिर्यादीने घराचा दरवाजा उघडून पाहिले असता आरोपी रिक्षातून आल्याचे कळाले शिवाय रिक्षामध्ये माणसे असल्याचे देखील फिर्यादीला दिसले. आरोपीने फिर्यादीच्या घराच्या दरवाज्याजवळ पडलेले दगड, बाटली फिर्यादीच्या घराच्या दिशेने भिरकावली,तसेच दगड मारून फिर्यादीच्या दुचाकीचे नुकसान देखील केले.

दरम्यान, आरोपी फिर्यादीच्या घराजवळ आला. फिर्यादीशी झटापट करून शिवीगाळ केली. तुला उचलून आणतो, अशी धमकी देऊन आरोपीने कपडे फाडून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. निगडी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.