Pune Crime : मारुंजी येथे अडीच किलो गांजासह एकास अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 29) दुपारी सव्वातीन वाजता सरकार चौक, (Pune Crime) मारुंजी येथे करण्यात आली. अटक केलेल्या आरोपीकडून 65 हजार 775 रुपयांचा 2.631  किलो गांजा जप्त केला आहे.

Pimpri : पिंपरीत तब्बल सहा लाखांची घरफोडी

मंगेश सहदेव गायकी (रा. सरकार चौक, मारुंजी, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी गायकी याने विक्रीसाठी गांजा आणल्याची माहिती (Pune Crime) हिंजवडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीच्या घरी छापा मारून गांजा जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.