Pune – रेकॉर्डवरील गुन्हेगारासह एकाला अटक; गावठी पिस्टलासह चार जीवंत काडतुसे केली जप्त

एमपीसी न्युज – रेकॉर्डवरील गुन्हेगारासह एकाला अटक करून गावठी पिस्टलासह चार जिवंत काडतुसे काल (दि.18)भवानी पेठ येथून जप्त केली. राहुल नितनवरे (रा.हडपसर) व संदीप मछिद्र चांदने (रा.फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गस्त घालत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार राहूल नितनवरे हा भवानी पेठ येथे येणार असल्याची पोलिसांना खबर्याकडुन माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कमरेला खोचलेले एक गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे सापडली.

पोलिसांनी त्याबाबत अधिक चौकशी केली असता त्याने ते शस्त्र त्याचा मित्र संदीप चांदने याने एका महिन्यापूर्वी त्याच्याजवळ ठेवण्यासाठी दिल्याचे सांगितले. स्वारगेट येथून संदीपला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने ते पिस्टल त्याचेच असल्याचे कबूल केले राहुलवर यापूर्वी एका खुनाचा गुन्हा देखील दाखल आहे

दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.