Bhosari Crime News : बनावट नोटा बाळगणा-यास अटक; तब्बल 80 हजारांच्या नोटा जप्त

एमपीसी न्यूज – बनावट नोटा बाळगणा-या व्यक्तीला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन हजार रूपये दराच्या 80 हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. ही घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.

संदिप पंढरीनाथ पांचाळ (वय 36, रा मु. वडगाव, पो. भारसवाडा, ता. जि. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी पोलीस शिपाई एस. ए. जाधव (वय 32) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पांचाळ हा परभणी येथील राहणारा आहे. त्याचे सासरे भोसरी येथे राहतात. पांचाळ याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी इंद्रायणीनगर, भोसरी येथे सापळा लावून आरोपी पांचाळ याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी पांचाळची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन हजार रुपये दराच्या 40 बनावट नोटा मिळून आल्या. या नोटा बनावट असल्याचे माहिती असूनही त्याने त्या खऱ्या असल्याचे भासवून चलनात आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पांचाळच्या ताब्यातून रोख सहा हजार 570 रुपये, सहा लाख रुपये किंमतीची कार असा एकूण सहा लाख सहा हजार 570 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.