Hinjawadi : सव्वाकिलो गांजासह एकाला अटक

एमपीसी न्यूज – सव्वाकिलो गांजासह एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.  ही कारवाई गुरुवारी (दि. 6) दुपारी दीडच्या सुमारास गवारेवाडी येथे करण्यात आली.

निलेश गंगाराम चव्हाण (वय 34, रा. हिंजवडी, फेज 2), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई अजित कुटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला एक इसम गवारेवाडी येथे ग्रीन व्हेजिटेबल मार्ट समोर गांजा घेऊन आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून निलेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 28 हजार 75 रुपये किमतीचा एक किलो 123 ग्रॅम वजनाचा गांजा आणि 460 रुपये रोख रक्कम असा एकूण 28 हजार 535 रुपयांचा ऐवज जप्त केला. बेकायदेशीररित्या अमली पदार्थ गांजा बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.