Dehuroad News: दुकानदाराला मारहाण करणाऱ्यांना अडविल्यावरून एकाला मारहाण

one beaten in dehuroad, case registered भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर सॅनिटायझरच्या स्टॅंडने पाठीत मारून जखमी केले.

एमपीसी न्यूज – दोघेजण मिळून एका दुकानदाराला मारहाण करीत होते. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एकाला दोन जणांनी मिळून सॅनिटायझरच्या स्टॅंडने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 8) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास मामुर्डी येथील साई चौकातील माताजी गिफ्ट स्टोअ येथे घडली.

सचिन मदनलाल सहानी (वय 40, रा. साई चौक, मामुर्डी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजिंक्य तिखे (वय 35, रा. गहुंजे), सतीश करे (वय 30, देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहानी शनिवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता फाईल विकत घेण्यासाठी साई चौकातील माताजी गिफ्ट स्टोअर या दुकानात गेले. त्यावेळी तिथे आरोपी दुकानातील मुकेश भाटी यांना किरकोळ कारणावरून मारहाण करीत होते.

त्यांची भांडणे सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर सॅनिटायझरच्या स्टॅंडने पाठीत मारून जखमी केले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.