Moshi : कामाचे पैसे मागितल्यावरून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – कामाचे पैसे मागितल्याच्या रागातून एकाला मारहाण केली. यामध्ये पैसे मागणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 10 जानेवारी रोजी सकाळी आदर्शनगर मोशी येथे घडली. याप्रकरणी 1 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुकाराम बाबू खरात (वय 39, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जितेंद्र सोनवणे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खरात यांचे आरोपी जितेंद्र यांच्याकडे कामाचे पैसे होते. ते पैसे मागण्यासाठी खरात 10 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जितेंद्र याच्याकडे गेले. खरात यांनी जितेंद्रला पैसे मागितले. या रागातून जितेंद्र याने खरात यांच्या डोक्यात दगड मारला. यामध्ये खरात गंभीर जखमी झाले. याबाबत 1 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.