Alandi Crime News : बांधकाम कामगार दाम्पत्यास मारहाण, एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बांधकाम कामगार दाम्पत्यास मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणीदाम्पत्याच्या सहकारी कामगाराच्या विरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अरुण उर्फ गणेह बंडगर (रा. आळंदी) असे आरोपीचे नाव असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याविषयी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

Pune Robbery Case : माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेताना तीन महिलांचे चोरले मंगळसूत्र

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती कोंडीराम खोर्दे यांनी त्यांच्या सहकाऱ्यास स्लॅबच्या कामाकरिता उभे केलेले लोखंडी खांब तुम्ही उतरवा मी इतर कामे करतो असे सांगितले. त्यामुळे चिडून जाऊन आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ केली, वीट फेकून तोंडाच्या हनुवटीवर फेकून मारली त्यामुळे फिर्यादीला दुखापत झाली. दरम्यान, फिर्यादी यांचे पती कोंडीराम खोरडे यांना सुद्धा डोक्यात सागवान लाकडाने मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे.

Eknath Shinde : अशी आहे ‘शिंदेसेना’; एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांची फायनल यादी समोर

दरम्यान, आरोपीच्या विरोधात आळंदी पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम 326, 324 व 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.