Bhosari Crime News : अंगावरून वाहन गेल्याने व्यक्तीचा मृत्यू; वाहनचालक पसार

एमपीसी न्यूज – अंगावरून वाहन गेल्याने गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 24) सकाळी साडेसहा वाजता जय गणेश साम्राज्य चौक, पांजरपोळ येथे घडली.

पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब तरडे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीची ओळख पटलेली नाही.

मयत व्यक्ती जय गणेश साम्राज्य चौकात सेंट्रल बँकेसमोर मोकळ्या जागेत झोपला होता. अज्ञात वाहन चालकाने हयगयीने वाहन चालवून झोपलेल्या व्यक्तीला धडक देऊन त्याच्या अंगावरून वाहन चालवले. यामध्ये गंभीर जखमी होऊन व्यक्तीचा मृत्यू झाला. मयत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. त्याचे वय अंदाजे 35 वर्ष आहे. भोसरी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.