Bhosari Crime News : तलवार बाळगल्या प्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे तलवार बाळगल्या प्रकरणी एका तरुणाच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 16) रात्री बालाजीनगर, भोसरी येथे करण्यात आली.

विनोद गणेश जाधव (वय 22, रा. निरंकारी मठाजवळ, बालाजीनगर, भोसरी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विशाल काळे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई असताना आरोपीने 100 रुपये किमतीची एक तलवार बेकायदेशीरपणे स्वतःजवळ बाळगली. याप्रकरणी पोलिसांनी विनोद जाधव याच्या विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) सह 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे.  याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.