Pune Crime News : ‘अजुन किती दिवस आईवडीलांचा आपला खर्च करणार’ असे म्हणताच तोंडी तलाक देत पत्नीला घराबाहेर काढले

एमपीसी न्यूज – अजुन किती दिवस आपल्या दोघांचाही खर्च माझेच आई-वडील करणार, असा जाब विचारल्याने संतापलेल्या पतीने तलाक तलाक तलाक म्हणून पत्नीला घराबाहेर काढले. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी 24 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती आकीब शेख, सासु रशिदा शेख यांच्यासह जेठ, जेठाणी, ननंद आणि तिचा पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maruti Bhapkar Arrested : आंदोलनाच्या तयारीत असलेले सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे 2016 साली आरोपी सोबत लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे. फिर्यादी यांचे लग्न झाल्यापासून फिर्यादीचा आणि त्यांच्या मुलीचा खर्च हे फिर्यादीचे आई-वडीलच करत होते. दरम्यान फिर्यादीने पतीला उद्देशून आणखी किती दिवस तेच लोक आपला खर्च करणार आहेत असा जाब विचारला. त्याचा राग आल्याने आरोपी पतीने फिर्यादी आणि तिच्या लहान मुलीला मारहाण करत आई-वडिलांपासून पाच लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीचा अतोनात छळ करत तीन वेळेस तलाक, तलाक, तलाक म्हणत तोंडी तलाक दिला आणि घराबाहेर काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.