Chinchwad Crime News : फुकट लोन करून देतो असे सांगत आयफोनचा अपहार

एमपीसी न्यूज – फुकट लोन करून देतो असे सांगत 52,978 रूपयांचे लोन करून आयफोन -11 चा अपहार केला. विजय सेल्स, वाकड येथे 13 फेब्रुवारी 2022 रोजी ही घटना घडली.

याप्रकरणी महेश प्रकाश ढगे (वय 39, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी शनिवारी (दि.21) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अभिजित आढाव या इसमाविरोधात अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित याने फिर्यादी महेश यांना फुकट लोन करून देतो असे आमिष दाखवले. फिर्यादी यांना विजय सेल्स वाकड येथे घेऊन गेले. व फिर्यादी यांच्या नावे बजाज फायनान्सचे 52 हजार 978 रूपयांचे लोन करून आयफोन 11 घेतला. तुम्हाला एटीएम मधून पैसे काढून देतो असे सांगून मोबाईलचा अपहार करून आरोपी फरार झाला. असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.