Hinjawadi Crime News : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्यास सांगून 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास दाम दुप्पट करून देतो, असे सांगून एकाची 10 लाख 99 हजार 886 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार डिसेंबर 2020 ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत मारूंजी येथे घडली.

सुमेध सुनील जोशी (रा. प्राधिकरण, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गजानन कृष्णराज कोमटकर (वय 35, रा. बुचडेनगर, मारूंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जोशी याने फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास दाम दुप्पट मिळतील, असे सांगून त्यांना 10 लाख 99 हजार 886 रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेले पैसे व त्यावरील परतावा न देता आरोपीने फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.