Nigdi Crime News : व्यवसायाच्या बहाण्याने महिलेची 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – केरळ येथील पुराच्या पाण्यात उभी असलेली वाहने खरेदी – विक्री केल्यास त्यातून भरपूर फायदा होतो, असे महिलेला आमिष दाखवून बँकेकडून 20 लाख रुपये कर्ज काढण्यास लावून ते पैसे एकाने घेतले. घेतलेले पैसे मुदतीत परत न करता फसवणूक केली. हा प्रकार सन 2019 ते 20 जानेवारी 2022 या कालावधी थरमॅक्स चौक, निगडी येथे घडला.

प्रल्हाद तिवारी (वय 40, रा. वाघोली रोड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सीमा अजाबराव मोरे (वय 37, रा. मोशी आळंदी रोड, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ येथे पुराच्या पाण्यात उभी असलेली चारचाकी वाहने कमी किमतीत मिळतात. त्या वाहनांचा खरेदी विक्रीचा व्यवसाय केल्यास भरपूर फायदा होईल, असे प्रल्हाद याने फिर्यादी यांना आमिष दाखवले. व्यवसायासाठी थरमॅक्स चौकातील एचडीएफसी बँकेतून फिर्यादी यांना 20 लाख रुपयांचे कर्ज घेण्यास लावले. ते पैसे आरोपीने व्यवसायात लावण्यासाठी घेतले. या कर्जाचे हप्ते भरण्याची तसेच वर्षभरात कर्जाची रक्कम परत देण्याची हमी देऊन ते कर्ज परत न देता आरोपीने फिर्यादी महिलेची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.