Pimpri Crime News : जुनी दुचाकी स्वस्तात देण्याच्या बहाण्याने 60 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – जुनी दुचाकी स्वस्तात देण्याच्या बहाण्याने एकाने एका व्यावसायिकाला 60 हजारांचा गंडा घातला. जुनी दुचाकी देऊन त्याचे व्यावसायिकाच्या नावे रजिस्ट्रेशन करून दिले नाही. व्यावसायिकाने याबाबत चौकशी केली असता त्या दुचाकीचे रजिस्ट्रेशन झाले असून त्यावर कर्ज असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार 15 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भाटनगर पिंपरी येथे घडला.

आकाश दशरथ पवार (वय 35, रा. नेहरूनगर, पिंपरी) याच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सोमनाथ रामचंद्र राऊत (वय 51, रा. आकुर्डी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना जुनी मोपेड दुचाकी स्वस्तात व सेकंड ओनर म्हणून नावावर रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगितले. फिर्यादी यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून 60 हजार रुपये रोख घेऊन आधारकार्ड, पॅनकार्ड अशी कागदपत्रे देखील घेतली. फिर्यादी यांना नंबर प्लेट नसलेली एक मोपेड दुचाकी दिली. मात्र दुचाकीचे पासिंग व रजिस्ट्रेशन करून दिले नाही. त्यामुळे फिर्यादी यांनी चौकशी केली असता त्या दुचाकीवर कर्ज असून ती दुस-या व्यक्तीच्या नावावर असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.