Hinjawadi Crime News : दुस-याच्या नावावर गाडी घेऊन एकही हप्ता न भरता गाडीची परस्पर विक्री

एमपीसी न्यूज – दुस-याच्या नावावर चारचाकी गाडी घेतली. त्याचे हप्ते न भरता गाडी मालकाच्या परस्पर विकली. याप्रकरणी अपहार केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 ऑगस्ट 2019 ते 26 मे 2022 या कालावधीत कोयते वस्ती, पुनावळे येथे घडला.

संतोष वसंत शेटे (वय 30, रा. शिवणे, ता. मावळ) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल चौधरी (रा. कोयते वस्ती, पुनावळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून अनिल याच्या नावावर लोन होत नसल्याने ते फिर्यादी यांच्या नावावर केले. त्यातून चारचाकी गाडी घेतली. गाडी घेतल्यानंतर अनिल याने एकही हप्ता भरला नाही तसेच फिर्यादी यांच्या परस्पर त्या गाडीची विक्री करून फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.