Pune Crime News : कत्तलीसाठी घेऊन जाणारी जनावरांची गाडी अडवली, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कत्तलीसाठी गाडीतून जनावरे घेऊन जाणा-याला पोलिसांनी अडवले असून जणावरांची सुटका केली आहे. याप्रकरणी 25 वर्षीय इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर गावच्या हद्दीत मंगळवारी (दि.21) हा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण नीळकंठ सूर्यवंशी यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अल्ताफ हाजी मुलानी (वय 25, रा. शेऴफाटा, इंदापूर, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिकअप मध्ये चार म्हशी व एक जर्सी गाय घेऊन त्यांची कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना पोलिसांनी अडवले. जनावरांची सुटका करून आरोपीकडून 3 लाख 9 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.