Bhosari Crime News : व्हॉट्सअपवर बदनामी करणारे स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत, प्रेम संबंधांसाठी आग्रह करुन व्हॉट्सअपवर बदनामी करणारे स्टेटस ठेवून महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार दिघी रोड भोसरी येथे 20 मार्च ते 26 मे 2022 या कालावधीत घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिलाश राऊत (वय 29, रा. अमरावती) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरु आहे.

आरोपी अभिलाश याने फिर्यादी महिलेला नको असतानाही शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मोबाईलवर सतत फोन करून त्यांचा पाटलाग केला. प्रेम संबंध ठेवण्यासाठी आग्रह केला. आरोपीने त्याच्या व्हॉट्सअपवर फिर्यादी महिलेची बदनामी करणारे स्टेटस ठेवून विनयभंग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे अधिक तपास करित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.