Hinjawadi Crime News : डी – मार्टमध्ये खरेदी करणाऱ्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – डी – मार्ट स्टोअर मध्ये खरेदी करत असलेल्या एका महिलेसोबत गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 18) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास हिंजवडी येथील डी – मार्ट स्टोअरमध्ये घडली.

याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने बुधवारी (दि. 20) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी रात्री हिंजवडी येथील डी – मार्ट स्टोअरमध्ये खरेदीसाठी गेल्या होत्या. रात्री पावणे आठ वाजता स्टोअर मध्ये खरेदी करत असताना एका अज्ञात इसमाने त्यांच्याशी जाणीवपूर्वक अश्लील वर्तन करून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.