Moshi Crime News : मैत्रिणीच्या मानलेल्या मामाने केला विनयभंग

एमपीसी न्यूज – मैत्रिणीच्या मानलेल्या मामाने महिलेचा आणि तिच्या अल्पवयीन मावस बहिणीचा विनयभंग केला. याप्रकरणी राजेसाब बाबू चौधरी नावाच्या मैत्रिणीच्या मानलेल्या मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून ते 22 ऑक्टोबर 2021 या कालावधीत मोशी आणि मुंबई येथे घडला.

पीडित महिलेने याप्रकरणी बुधवारी (दि. 27) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांच्या मैत्रिणीचा मानलेला मामा आहे. त्याने फिर्यादी आणि त्यांची 16 वर्षीय मावस बहीण यांच्याशी अनेकवेळा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी आणि त्यांच्या मावस बहिणीकडे शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करून त्यांच्याशी गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.