Sangvi Crime News : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत लग्नाची मागणी घालून हात कापून घेण्याची धमकी

एमपीसी न्यूज – मेकअपचे साहित्य आणण्यासाठी बाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून एका तरुणाने तिला लग्नाची मागणी घातली. लग्न न केल्यास स्वतःचा हात कापून घेण्याची धमकी देत तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 13) सायंकाळी पावणे सहा वाजता नवी सांगवी येथे घडली.

निलेश (पूर्ण नाव पत्ता महिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी फिर्यादी यांची 17 वर्षीय मुलगी मेकअपचे साहित्य आणण्यासाठी क्रांती चौकात गेली होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून हात व पाय पकडून ‘माझ्याशी लग्न कर. नाहीतर मी माझा हात कापून घेईन’ अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या घराजवळ येऊन दमदाटी व शिवीगाळ करून मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.