Sangvi Crime News: महिलेची 1 लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज – महिलेच्या खात्यावरून अज्ञाताने पैसे काढून घेत 1 लाख 12 हजारांची ऑनलाईन फसवणूक केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . ही घटना सांगवी येथे नुकतीच उघडकीस आली.

निता रावसाहेब साठे (वय-31, रा. सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी साठे यांच्या बँकेच्या खात्यातून 10 ते 15 ऑगस्ट या कालावधीत अज्ञात आरोपीने 28 वेळा 4 हजार रूपये काढून घेतले. तर, 1 वेळा 200, 190 चे एकवेळा असे पैसे काढून घेत 1 लाख 12 हजार 400 रूपये बॅक खात्यावरून काढून घेत ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.