Talegaon Crime News : अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नात्यातील व्यक्तीकडून बलात्कार

एमपीसी न्यूज – नात्यातील एका व्यक्तीने जबरदस्तीने एका महिलेवर बलात्कार केला. त्यावेळी त्याने महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ महिलेचा पती आणि अन्य नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत त्याने वारंवार महिलेवर बलात्कार केला. हा धक्कादायक प्रकार जानेवारी 2019 ते जून 2021 या कालावधीत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (दि. 18) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिच्या नात्यातील 34 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित महिलेचा आतेभाऊ आहे. पीडित महिला घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन धमकी देऊन तिच्यावर बळजबरी करून बलात्कार केला. त्यावेळी आरोपीने महिलेचा अश्लील व्हिडीओ बनवला. तो व्हिडीओ तिच्या पतीला आणि इतर नातेवाईकांना दाखवण्याची धमकी देत आरोपीने महिलेवर वारंवार बलात्कार केला.

याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 376, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक धापटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.