Nigdi Crime News : सकाळच्या वेळी प्राधिकरणात दोन सोनसाखळ्या हिसकावल्या

एमपीसी न्यूज – निगडी प्राधिकरण परिसरात गुरुवारी (दि. 28) सकाळी एका अनोळखी व्यक्तीने दोन सोनसाखळ्या हिसकावून नेल्या. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार एका अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असलेल्या लॉंड्रीच्या दुकानात इस्त्रीसाठी दिलेले कपडे आणण्यासाठी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून मोपेड दुचाकीवरून आरोपी आला. त्याने फिर्यादी यांच्या गळ्यातील एक लाख 21 हजार 923 रुपयांची 32.610 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून नेली.

काही अंतरावर गेल्यानंतर अर्चना चिकोडीकर यांच्या गळ्यातील 4.5 ग्रॅम वजनाची 15 हजार रुपये किमतीची सोन्याच्या चेनचा तुकडा देखील चोरट्याने जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.