Moshi Crime News : दुकानात अंडी घेत असलेल्या महिलेचे हिसकावले दागिने

एमपीसी न्यूज – दुकानात अंडी घेत असलेल्या महिलेच्या गळ्यातील 50 हजारांचे मिनिगंठन अनोळखी चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना स्पाईन रोड, मोशी प्राधिकरण येथे मंगळवारी (दि. 21) रात्री घडली.

विजेता सावन राठोड (वय 27, रा. मोशी प्राधिकरण, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राठोड मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथे त्यांच्या सोसायटी जवळ एका दुकानातून अंडी खरेदी करत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने राठोड यांच्या गळ्यातील 50 हजारांचे सोन्याचे मिनीगंठण जबरदस्तीने हिसकावून चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.