Hinjawadi Crime News : मालकाचा राग काढला सहकारी कामगारावर

एमपीसी न्यूज – कॅंटीन मालकाने कामावरून काढल्याने एका कामगाराने दुसऱ्या कामगारास लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 18) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास साखरे वस्ती, हिंजवडी येथे घडली.

भगवान पाती रामसिंग (वय 26, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) असे जखमी झालेल्या कामगाराचे नाव असून त्यांनी बुधवारी (दि. 18) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजेंद्र श्रीशैल पुजारी (वय 32, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे हिंजवडी येथील बिर्ला सॉफ्टवेअर कंपनीतील कॅंटीनमध्ये कामाला आहेत. आरोपी पुजारी हा गेल्या दहा दिवसांपासून कामावर येत नव्हता. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यास कामावर यायला सांगितले. तरीदेखील तो कामावर न आल्याने कॅंटीनचे मालक मंगेश वेदपाठक यांनी फिर्यादी रामसिंग यांना त्यास कामावर यायचे नसल्यास खोली खाली करण्याबाबत निरोप दिला.

याचा राग मनात धरून आरोपी पुजारी हा बुधवारी मध्यरात्री दीड वाजता फिर्यादी झोपलेल्या ठिकाणी आला. ‘तुझ्यामुळे माझी नोकरी आणि राहण्याची खोली गेली’ असे म्हणत लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या पायावर पाठीवर खांद्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत फिर्यादी यांच्या डाव्या पायाच्या हाड मोडले. तसेच खांद्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर आरोपी पुजारी याने फिर्यादी रामसिंग शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.